जातीवाचक शिवीगाळ गुन्हा प्रकरणी नागेश अक्कलकोटेंसह 8 जणांची निर्दोष मुक्तता

0
236

जातीवाचक शिवीगाळ गुन्हा प्रकरणी नागेश अक्कलकोटेंसह 8 जणांची निर्दोष मुक्तता ; बार्शीतील जिल्हा बसू सत्र न्यायालयाचा निकाल

बार्शी – जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यातून 9 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. चिखर्डे येथील घटनेत बार्शीतील जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस डी अग्रवाल यांनी हा निकाल दिला असून बानपा विरोधी पक्षनेते एड.नागेश अक्कलकोटे यांच्यासह 8 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तालुक्यातील चिखर्डे येथे 2009 च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या एट्रोसिटी आणि हल्ल्याच्या गुन्ह्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने जाहीर केला. याप्रकरणी आरोप सिद्ध न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 22 ऑक्टोबर 2009 रोजी चिखर्डे येथील हनुमंत विलास अपुणे त्यांच्या समाधान तुपेरे, अमित कोंढारे, समीर शेख, विजय कोंढारे या मित्रांसोबत तुकाई मंदिराजवळ गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी, पिंटू उर्फ संजीव सातपुते, सतिश सातपुते, नागेश अक्कलकोटे हे सुमो गाडीतून तेथे आले. तेव्हा, गावातील भगवंत पाटील, जवाहरमल पाटील, बापू पाटील श्रीराम उर्फ समाधान कोंढारे, प्रकाश कोंढारे, विनायक कोंढारे हेही तेथे गोळा झाले. यावेळी, भगवंत पाटील यांनी समाधान तुपेरे यांस जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच तलवारीने मारले, विनायक कोंढारे यांनी गजाने मारले, अक्कलकोटे यांनी ब्लेडने मारले व इतरांनी काठीने मारहाण केली. गावकऱ्यांनी सोडवा सोडवी केल्यानंतर ते निघून गेले, अशी फिर्याद पांगरी पोलिसात दिली होती. त्यानुसार, वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मौला चौधरी यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकिल ऍड .मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात सदर गुन्यात कोणतेही शस्त्र पोलीसांनी जप्त केले नाही.
त्यामुळे आरोपींनी मारहाण केली हे म्हणता येणार नाही. तसेच राजकीय द्वेषापोटी सदर गुन्हयात खोटे पणाने गुंतविल्याचे दिसून येते असा युक्तीवाद मांडला तो ग्राह्य
धरून न्यायालयाने सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात नं.१ ते ३ तर्फ ऍड. मिलिंद थोबडे, निखिल पाटील, तर
आरोपी न.४ ते ९ तर्फ अँड धनजय माने यांनी तर सरकारतर्फ अॅड.पी.ए.बोचरे यांनी काम पहिले.

दरम्यान, जातीवाचक शिवीगाळ झाल्याचं म्हटलेल्या व्यक्तीची साक्षच घेतली गेली नाही. तसेच आरोप सिद्ध झाले नसल्याने जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here