बार्शी तालुक्यात ४० कोरोना बाधितची वाढ ; एकूण आकडा 1400 पार
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच असून यामुळे स्वॅब व रॅपीड तपासणी बाधित रुग्णांची संख्याही वाढ असल्याने सर्वत्र चिंता वाढली आहे .दि १२ ऑगस्ट रोजीच्या अहवालात ४० रुग्ण पॉझिटिव आले आहेत.

बार्शी तालुक्यातसह शहरातही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे .रोज नवनवीन भागात कोराना बाधित रुग्ण मिळून येत असल्याने कोरोचा विळखा वाढतच आहे. आज आलेल्या अहवालात शहरातील २४५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असुन त्यापैकी २२४ अहवाल निगेटिव्ह आले .

शहरातील शिवाजी नगर १, सुभाषनगर १, जयशंकर मील १, दत्तनगर १, लोकमान्य चाळ १, खुरपे बोळ २, ऐनापुर मारुती रोड १, सुश्रुत हॉस्पीटल १, कसबा पेठ १, मुल्ला प्लॉट कुर्डुवाडी रोड १, बाळेश्वर नाका १, आण्णाभाऊ साठे नगर १, नाळेमळा सोलापूर रोड १, गाडेगाव रोड ३, तुरटगल्ली २, दत्त बोळ १, धारूरकर बोळ १ असे २१ रुग्ण शहरात सापडले आहे.

ग्रामिण भागातील ६८ प्राप्त अहवाला पैकी ४९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत . वैराग येथे ७ अहवाल पॉझिटिव्ह आले तर उंबरगे ३, दडशिंगे ३, श्रीपत पिंपरी ४, ढेंबरेवाडी १, ताडसौंदणे १ असे १९ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत.

यामुळे आज पुन्हा ४० कोरोना बाधित रुग्णांची वाढ होवुन एकुन तालुक्यात रुग्ण संख्या १४०९ वर पोहचली आहे . तर यापैकी बरे होणार रुग्णांची संख्या ९५६ झाली आहे . सध्या ४०७ बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत . मात्र नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने कंटनमेंट झोनची संख्या २११ वर पोहचली आहे