बार्शी तालुक्यात २५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; एकुण रुग्ण संख्या पोहचली ६१५ वर,
आजबरे झाले २७ रुग्ण
बार्शी : बार्शी तालुक्यात गुरुवार २३ रोजी आलेल्या अहवालात २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे . तर २ जण मयत झाले आहेत . तर आज जमेची बाजु अशी की २७ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे .

बार्शी शहरासह तालुक्यात कोरोना सारी रुग्णांचे प्रमाण काही केल्या कमी होत नसुन यासाठी प्रशासनाने आणखीण सतर्क राहुन काम करावे लागणार आहे .

आज बार्शी तालुक्यात ४४ स्वॅब अहवाल प्राप्त झाले यापैकी बार्शी शहरात अलीपुर रोड -१ अध्यापक कॉलनी कुर्डुवाडी रोड – १ , के व्ही नगर १ सलगर गल्ली १ ,राऊत चाळ -१,वाणी प्लॉट कॅन्सर हॉस्पीटल- १,ख्वाजा नगर -१, मोमीन गल्ली – १,सिध्देश्वर नगर -१ असे नऊ पॉझिटिव्ह रुग्ण

सापडले तर ग्रामिण मध्ये वैराग -४, पानगाव -३, देगाव- १, हळदुगे – १ ,जामगाव आ-४, अरणगाव- २, नारिवाडी – १ असे १६ रुग्ण सापडले आहे. आज अखेर ६१५ बाधित रुग्ण संख्या झाली आहेत .तर
आणखी १०८ स्वब अहवाल प्रलंबित आहेत . १४० कंटेनमेंट झोन असुन ११९ कंटेनमेट झोन सुरु आहे तर २१ कंटेनमेंटने आपला कालावधी पुर्ण केला आहे
