दोन वर्षात चेअरमन रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचा झाला कायापालट; वाचा सविस्तर-
आज बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा सत्ता पालट होऊन दोन वर्षे पूर्ण झाली.या दोन वर्षातील समितीचा झालेला कायापालट पाहिला तर नक्कीच या समितीच्या चेअरमन पदाची धुरा अत्यंत सुयोग्य हातात गेल्याची खात्री होते. आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गर्शनाखाली बाजार समितीचे चेअरमन रणवीर राजेंद्र राऊत यांनी कित्येक वर्ष अधोगतीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बाजार समितीला कुशल नेतृत्वाच्या जोरावर बाहेर काढत शेतकऱ्याला अन् बार्शीकर जनतेला न्याय देऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. गेल्या दोन वर्षांत खालील अनेक कामे बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.


- रस्ते,गटारी, पाइपलाइन नूतनीकरण
2.रस्त्याच्या दुतर्फा झाडे
3.बाजार समिती ऑफिस, हमाल भवन, गेट, वॉल कंपाऊंड यांची डागडुजी, रंगकाम व सुशोभीकरण - 75 एलइडी बल्ब,2 हायमास्ट दिवे, स्ट्रीट लाईट ची कामे
- DCC बँकेच्या मजबुतीकरनासाठी बँकेत तब्बल दोन कोटींची ठेव
- 700 हमाल तोलार कष्टकरी बांधवांसाठी घरकुल मिळावे म्हणून बाजार समितीच्या जागेत हमाल नगरचे भूमिपूजन. यासाठी 6 एकर जागा राखीव करण्यात आली आहे.
- बाजार समितीत गोदाम व धान्य चाळणी यंत्राचे भूमिपूजन
7.केरळ पूरग्रस्तांना 1 लाखांची मदत
8.गांडूळ खत प्रकल्पासाठी संमती

9.बाजार समितीच्या लातूर रोडवरील जागेत व्यापारी संकुल व वसतिगृह बांधणीसाठी 3 कोटी 83 लाखांचा प्रस्ताव
10.सोयाबीन प्रकल्पासाठी 8.5 एकर जमीन राखीव
- बाजार समितीच्या आवारात स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था व सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमणूक
- स्वच्छतागृह व हमाल भवणाभोवती कुंपण यासाठी पणन मंडळातर्फे मंजुरी
- बाजार समितीच्या कर्मचऱ्यांसाठी अनेक वर्षांपासून रखडलेला पदोन्नतीचा प्रश्न निकालात.तसेच सहावा वेतन आयोग फरकासह लागू.
- शेतमाल तारण योजनेअंतर्गत 62 शेतकऱ्यांना 33 लाख 50 हजार रुपयांचे वाटप
- राज्यातील 80 बाजार समत्यांमध्ये बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितिचा 10 क्रमांक
16.वैराग येथील उपबाजार समितीमध्ये हमाल तोलारांसाठी घरकुल योजना,बेदाणा शीतगृह, हमाल भवन सभागृह प्रस्तावीत.

- 3 फेज 30 किलो वॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर
18.सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत - बार्शी तालुक्यातील जलसंधारण योजनेसाठी दर वर्षी बाजार समिती तर्फे 3 कोटी निधी
- कोरोना काळात तब्बल 3000 कुटुंबांना मोफत अन्न धान्य वाटप
- शेतपुरक व्यवसायासाठी बाजार समितीच्या आवारात १ कोटी २३ लाख रुपयांच्या २३ गाळ्यांच्या शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन
- नुकतीच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती व मर्चंट असोसिएशनच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गरीब व गरजू कोरोना रुग्णांच्या औषधे करिता ५ लाख ₹ ची मदत जाहीर झाली आहे
23.कृषिउत्पन्न बाजार समिती, बार्शी तर्फे कोरोणा ग्रस्तांच्या मदतीसाठी PM फंड मध्ये १ लाख रुपये मदत
24.बार्शी बाजार समिती मधील ओपण स्पेस मध्ये 27 प्रकारच्या 164 औषधी व दुर्मिळ वृक्षांची लागवड - केंद्र शासनाच्या एकात्मिक कृषी पणन योजनेच्या उपाययोजना म्हणून कर्जाशी निगडित कृषी पणन सुविधा उभारण्यासाठी योजेने अंतर्गत बाजार समिती तर्फे 22 कोटी 45 लाख रुपयांचा आराखडा मजूर. 26.वैराग उपबाजार समितीचे मा.अा. कै. चंद्रकांत निंबाळकर असे नामकरण.
27.वैराग मध्ये मुक्या जनावरांसाठी चारा छावणी.
????लेखन – प्रा.संदीप पवार सर.