सोलापूर ग्रामीण भागात सोमवारी 152जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू,पंढरपूर माळशिरस मध्ये जादा वाढ

0
453

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध गावात व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आज सोमवारी ग्रामीण भागातील 152 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 95 पुरुष तर 57 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 328 आहे. आज 1352 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1200 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे.

तालुकानिहाय सापडलेले रुग्ण

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अक्कलकोट तालुक्यातील 442 रुग्ण,बार्शी येथील 701 ,करमाळा येथील 80 ,माढा येथील 127 , माळशिरस येथील 142 बाधित रुग्ण, मंगळवेढा मधील 83 ,मोहोळ तालुक्यातील 206,उत्तर सोलापुरातील 228 जण बाधित आहेत.पंढरपूर तालुक्यातील 394 ,
सांगोला तालुक्यातील 45, दक्षिण सोलापुरातील 524 रुग्ण असे एकूण 2972 जणांचे अहवाल आजवर पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात अक्‍कलकोटमधील बेडर गल्ली, मस्के गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील आळसुंदे, शेलगाव (क) येथे अनुक्रमे एक व दोन रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील कुर्डूवाडीत तीन, मुंगशीत एक, पडसाळीत दोन, रांझणीत चार, रिधोऱ्यात चार, तांदुळवाडी, उपळाई खु. येथे प्रत्येकी एक.

माळशिरसमधील अकलुज व बोरगावमध्ये 
प्रत्येकी तीन, माळीनगर, श्रीपुर, उघडेवाडी, सिध्दार्थ नगर, विझोरीत प्रत्येकी एक, तर संग्राम नगर व वेळापुरात दोन, यशवंत नगरात सहा रुग्ण आढळले आहेत. मंगळवेढ्यातील बावची, फॅबटेक कारखाना कॉलनी, कात्राळ येथे प्रत्येकी तीन, मुंडवीत चार.

मोहोळमधील आष्टे, खंडाळी, कोरवली, लांबोटी, नरखेड येथे प्रत्येकी एक, यावलीत दोन रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील पडसाळीत आठ, सांगोल्यातील वासूद रोडवर, कोळा येथे प्रत्येकी एक, दक्षिण सोलापुरातील हत्तुर, होटगी येथे प्रत्येकी एक, कंदलगावात 15, मंद्रूपमध्ये चार रुग्ण सापडले.

तसेच बार्शीतील अलिपूर रोडवर दोन, मनगिरे मळा, सिध्दार्थ नगर, सुभाष नगर, धोत्रे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पंढरपुरातील अनिल चौकात दोन, भोसले चौक, गांधी रोड, खवा बाजार, कुंभार गल्ली, महाद्वार, रेल्वे कॉलनी, रोहिदास चौक, सांगोला रोड, विप्रदत्त घाट, करोळे, नेपतगाव येथे प्रत्येकी एक, घोंगडे गल्ली, गोविंदपुरात प्रत्येकी सात, हनुमान मैदान, जुनी पेठेत प्रत्येकी तीन, इसबावीत चार, सणगर गल्लीत चार, संतपेठेत दोन, तानाजी चौकात सात, विजापूर गल्लीत चार रुग्ण आढळले आहेत. 

जिल्ह्यातील आकडेवारी

जिल्ह्यातील एकूण 23 हजार 69 व्यक्‍तींची झाली कोरोना टेस्ट  एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार 972 झाली  आतापर्यंत जिल्ह्यातील 57 पुरुष आणि 25 महिलांचा कोरोनाने घेतला बळी  एक हजार 352 पैकी 152 पॉझिटिव्ह; सात जणांचा झाला मृत्यू  आतापर्यंत एक हजार 605 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 285 रुग्णांवर उपचार सुरु 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here