बार्शीत चार दिवसात 562 कोरोना बाधित रुग्ण सापडले; 14 मृत्यू ,मंगळवारी एका दिवसात 193 ची भर

0
181

बार्शीत चारदिवसात 562 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले; 14 मृत्यू ,मंगळवारी एका दिवसात 193 ची भर

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ सुरूच आहे. शनिवार ते मंगळवार या चार दिवसात दिवसात 562 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बार्शी शहरात 193 तर ग्रामीण भागात 377  रुग्ण आहेत. या तीन दिवसात 14 मृत्यू झाले आहेत.अशी माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक ढगे यांनी दिली.या कालावधीत  6990 जणांच्या रॅपिड व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

या चार दिवसात शहरात 1918 तर ग्रामीण भागात 3110 चाचण्या करण्यात आल्या. तीन दिवसात 384 जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. बार्शीत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट रुग्णांची संख्या ही जास्त आहे.

त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर आणि रेमडीसीविर इंजेक्शन चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक मात्र घाबरले आहेत. ऑक्सिजन चा ही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्व कोविड हॉस्पिटल फुल्ल झाले आहेत. रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक अक्षरशः हॉस्पिटलमध्ये हेलपाटे मारून वैतागून गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here