बार्शी तालुक्यात मंगळवारी ही सापडले पुन्हा ४ पॉझिटिव्ह रुग्णतालुक्यात संख्या पोहचली ११० वर तर बरे झाले ४२ रुग्ण
बार्शी : बार्शी तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मंगळवार ७ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकारीच्या अालेल्या अहवालपैकी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.


बार्शी शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असुन यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या आलेल्या अहवालात बार्शी तालुक्यातील ४७ स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये मंगळवार पेठ येथे १, व्हनकळस प्लॉट परंडा रोड-१,साकत पिंपरी-१, वैराग -१ असे ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.
तर ८७ स्वॅबअहवाल प्रलंबित आहेत आजपर्यत बार्शी तालुक्यात ११० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असुन यापैकी ४२ रुग्ण बरे झाले आहेत तर ६३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आत्तापर्यंत कोरोनामुळे तालुक्यात ५ जण मयत झाले आहे .
