
गणेश भोळे
वाढत्या रुग्णांमुळे बार्शी तालुका ठरतोय कोरोना हॉटस्पॉट
मंगळवार पुन्हा सापडले १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
घाणेगाव येथे आढळले ४ रुग्ण , एकुण संख्या पोहचली २१३

बार्शी :बार्शी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दररोज होत असलेल्या वाढीमुळे बार्शी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने दररोज कोरोनाची साखळी वाढतच चालली आहे आज मंगळवार दि १४ रोजी आलेल्या अहवालात पुन्हा तालुक्यात १६ कोरोना चे रुग्ण आढळले आहेत . यामुळे एकूण संख्या २१३ वर पोहचली आहे .
बार्शी शहरासह वैराग भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांत भरमसाठ वाढ होत असुन याची साखळी तयार होत आहे . यामुळे अनेक कुटुंबचे कुटुंब याच्या विळख्यात अडकत चालले आहेत यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होत आहे .

मंगळवार रोजी आलेल्या अहवालात कसबा पेठ एक ,म्हाडा कॉलनी एक , नागणे प्लॉट एक, बारंगुळे प्लॉट एक, घाणेगाव चार, गुळपोळी एक, पानगाव एक ,साकत पिंपरी दोन, सासुरे दोन वैराग एक बाभुळगाव एक असे १६ रुग्ण आढळले आहे .
