बार्शी तालुक्यात आज १९ बाधित रुग्ण वाढले
तर दोन मयत, ५४ जणांना उपचारांनंतर सोडले घरी
बार्शी : शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन बुधवार दि ५ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवाला १९ बाधित रुग्ण वाढले असून दोन मयत झाले आहेत जमेची बाजु अशी की ५४ बाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

बार्शी तालुक्यातील ३५ स्वब अहवालात तर १४६ अन्टीजन रॅपीड टेस्ट असे १८१ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे यापैकी शहरातील सुभाष नगर १, भिसेप्लॉट १ ,तुळजापुर रोड २, सोलापुर रोड १ ,
हांडे गल्ली १, लक्ष्मी नगर १, लहजी चौक १ ,डमरेगल्ली २, आडवा रस्ता १, सलगर गल्ली १, असे १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .

तर ग्रामिण भागात वैराग ४, शेळगाव १ ,मळेगाव १, तडवळे (या) १ असे ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बार्शी तालुक्यात १९ रुग्ण वाढल्याने एकुण बाधित संख्या ११३६ झाली आहे . मात्र दररोज रुग्ण संख्या वाढत असली तरी उपचारानंतर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

आतापर्यंत ६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सदया ४१५ जण उपचार घेत आहेत . तर एकुण मयताचा आकडा ४२ वर पोहचला आहे. शहर व तालुक्यात १६० कंटनमेंट झोन आहे तर ६७ झोन कंटनमेंटने आपला कालावधी पूर्ण केला आहे .