मुंबई | कोरोना संकटात अद्यापही शाळा, कॉलेज, महाविद्यालयं अजूनही सुरू झालेले नाहीत. अशातच पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्य सरकारने 2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरु केलं आहे.


त्यानुसार ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्षात शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांच्या आणि पालकांच्या मनात तणाव राहू नये, त्यांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
आता शैक्षणिक वर्ष 2020 आणि 2021 साठी पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधक परिक्षक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.