हवं तेवढं फिरून घ्या नंतर फिरता येणार नाही, या नेत्याचा आदित्य ठाकरेंना टोला..!
काल मुंबईतील अनेक सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले होते. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील भागांची पाहणी केली या पाहणीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.


प्रत्येक पावसात मुंबईकरांना बाहेर पडू नका असं सांगितलं जातं. पण मुंबई महापालिकेने पावसात बाहेर पडण्यासारखी मुंबई ठेवली आहे का,’ असा सवाल करत महानगर पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे.
सिने-अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणावरूनही त्यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला हाणला आहे. ‘सुशांतचे प्रकरण बिहार सरकारकडून सीबीआयकडे सोपवले जाणार आहे. त्यामुळे पाहिजे तेवढं फिरून घ्या, नंतर फिरता येणार नाही,’ असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. यावर शिवसेना काय देते हे पाहावे लागणार आहे.