कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ; प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई,आदेश जारी; वाचा सविस्तर-

0
431

कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ; प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई,आदेश जारी

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : सोलापूर  शहरासोबत आता ग्रामीण जिल्ह्यातही कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो  कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.मात्र या प्रयत्नांना नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणारआहे. याप्रकरणी काय केल्यास किती दंड वसूल करण्यात येणार याबाबत चे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकीवर दोघेजन हेल्मेट व मास्कसह, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन, चार चाकी वाहनात चालक व इतर तिघे आणि टॅक्सी/कॅब/ॲग्रीगेटर चालक व इतर तिघांना परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल

अ.क्र.उल्लंघनाचे स्वरूप आकारण्यात येणारा दंड

1 मास्क न वापरल्यास100 रूपये

2 दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्यास500 रूपये (वाहन चालकास)

3 तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या आढळल्यास500 रूपये (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)

4 चारचाकी वाहनातून चारपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास500 (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)

5  निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास (अत्यावश्यक सेवा वगळून)एक हजार दंड.

दोनवेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित.

6  साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकाने/ आस्थापनामध्ये आढळल्याससात दिवसांपर्यंत दुकान सील

7  दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास500 रूपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रूपये

8  होम क्वारंटाईन योग्य रितीने न पाळल्यासएक हजार रूपये.

9  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास200 रूपये

10  सुरक्षित अंतर न ठेवल्यास100 रूपये (प्रत्येकी)

11  सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन केल्यास500 रूपये.
12 दुकानदार/व्यावसायिक/फिरते फळ व भाजी विक्रेते मास्क न वापरल्यास100 रूपये.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, पोलीस प्रशासन, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (आरोग्य), नगरपालिका मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी आदेशात नमूद  करण्यात आले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here