आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहीन, रिया चक्रवर्ती हिची भावुक पोस्ट
सिने-अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने मागच्या महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती यानंतर हित्रपट सृष्टीत दोन गट पाहावयास मिळले होते तसेच सुशांतसिंह राजपूत याची अत्यन्त निकटवर्तीय म्हणून समजली जाणारी रिया चक्रवर्ती हिची सुद्धा पोलिसांनी कसून चौकशी केली होती. मात्र यावरी तिने आपल्या आणि सुशांतच्या नात्याबाबत बोलणे टाळले होते.

मात्र आज अखेर सुशांतच्या जाण्याच्या एक महिन्यानंतर रिया चक्रवर्ती=ने एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सुशांतला भावुक एक पत्र लिहिले आहे. त्या पात्रात तिने त्यांच्यातल्या नात्याचा उलगडा केला आहे.
वाचा कायलिहिले आहे पोस्टमध्ये….!
मला आजही माझ्या भावना आवरता येत नाहीयेत… माझ्या मनाला न भरता येणारी जखम झालीय.

तुझ्यामुळे माझा प्रेमावर विश्वास बसला, त्याची ताकद कळली. तू मला शिकवलं, की कसं गणिताच्या एका साध्या समीकरणातून अख्ख्या जीवनाचा अर्थ काढता येऊ शकतो. खरं सांगते, तुझ्याकडून मी दररोज काहीतरी नवीन शिकले. मला कदाचित यावर कधीच विश्वास बसणार नाही की तू आता इथे नाहीये.

मला माहितीय की तू आता एका जास्त शांत ठिकाणी आहेस… तिथे चंद्र आहे, तारे आहेत, त्या आकाशगंगांनी तुझ्यासारख्या ‘सर्वांत महान भौतिकशास्त्रज्ञाचं’ जंगी स्वागत केलं असेल.

तू दयाळू होतास, उत्साही होतास… एखाद्या तुटलेल्या ताऱ्यालाही तू खुलवशील असा. आता तूच आहेस… एक तुटता तारा. मी वाट बघेन तुझी, माझा तुटता तारा… की तू माझ्याजवळ परत यावं.
एक चांगली व्यक्ती होण्यासाठी जे काही लागतं, ते सारं काही तुझ्यात होतं. कदाचित तू या जगात सर्वांत महान होतास. आपलं प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे नेमके शब्द नाहीच… आणि मला वाटतं तू खरंच बोलला होतास जेव्हा तू म्हणाला होतास की आपल्या दोघांच्याही समजण्यापलीकडे आहे हे सारं.
तू खुल्या मनाने सर्वच गोष्टींवर प्रेम केलं, आणि आता तुझ्यामुळे मला हे कळून चुकलंय की आपलं प्रेम खरंच निस्सीम होतं.
तुला शांती मिळो, सुशी.
30 दिवस तुला गमावून झाले… पण तुझ्यावर प्रेम आयुष्यभर करेन.
आयुष्यभरासाठीचे ऋणानुबंध… अनंत काळापर्यंत आणि त्यापलीकडेही…