मला पुन्हा आई व्हायचं आहे… वाचावा असा लेख

0
1376

मला पुन्हा आई व्हायचं आहे…
जयश्री कन्हेरे -सातपुते

शीर्षक वाचून कळलं असेलच… या कथेतील नायिका एकदा आई झालेली आहे… मग तिला पुन्हा आई का व्हायचं आहे..? तर मग बघूया.. नायिकेला पुन्हा आई का व्हायचं आहे…

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


कथा आहे समीक्षा ची..

समीक्षा व राघव च्या लग्नाला 8वर्ष होत आली होती.. अर्णव त्यांचा 5वर्षाचा मुलगा.. मुलगा असल्यामुळे दुसरा चान्स न घेण्याच दोघांचंही ठरलं होत.. (बऱ्याच जागी पाहिली मुलगी असली की दुसरा चान्स हमखास घेतात..अपवाद असतील काही पण हे कटुसत्य आहे )

अर्णव पाच वर्षाचा होतोय.. दुसरा चान्स कधी घेतेस.. म्हणून नातेवाईक, मित्रपरिवार समीक्षा व राघवला.. विचारत होते..


यांचं ठरलेलं उत्तर “एकच बस झाला.. हाच तर डोक्याला ताप आणतो..आणि या महागाईच्या जमान्यात दोन मुलं कशी सांभाळायची. दोघांच्याही इच्छा पूर्ण तर करता यायला पाहिजे न आपल्याला ”

या उत्तराला ऐकून लोक विचार करायचे की “कस काय असं म्हणू शकतात हे दोघेही.. दोघेही नोकरीवर, घरी सगळं व्यवस्थित आहे. तरीही यांचं पैसा पुरेल की नाही.. मुलांना सांभाळता येईल की नाही हेच सुरु असत..


काय आजकालची पोर ही.. दोन मुलं नाही सांभाळू शकत..

एक वर्ष लोकांचं बोलणं ऐकण्यात व “दुसरा चान्स कधी? ” यातच गेलं.. आता अर्णव सहा वर्षाचा होत आला.. आणि समीक्षा मधली आई… जी नोकरीं व घरच्या स्थितीमुळे कुठेतरी दडून बसलेली होती.. ती आता डोकं वर काढू बघत होती… म्हणजे तिचीही इच्छा दुसरा चान्स घ्यायची होती..

अर्णवच्या वेळी जे अनुभवता नाही आल ते आता अनुभवाव असं तिला वाटत होत..

आणि तिने राघवला या बाबतीत विचारले…. “राघव.. आपण दुसरा चान्स घ्यायचा का? ” अग.. हे काय नवीनच आता.. आपल ठरलंय न एकच बाळ राहू द्यायचं.. आणि तुला किती त्रास झाला अर्णवच्या वेळी.. तुझी पुन्हा मानसिक तयारी झाली.. आई होण्याची?हो तसंच समज.. झाली माझी मानसिक तयारी… अर्णवच्या वेळी जरा अल्लड पणा होता. आता समजदारी आली.. आणि नातेवाईक विचारतात “दुसरं कधी.. सगळं तर आहे तुमच्या कडे दोन मुलं सांभाळू शकता मुलांना सोबत हवीच बहीण -भावाची “

असं ऐकलं की विचार येतो.. काय हरकत आहे दुसरा चान्स घ्यायला.. तुझी मानसिक तयारी आहे का त्या सर्व गोष्टीतून जायची ते बघ.. मी आहेच सोबत तुझ्या.. अर्णवच्या वेळचा तुझा त्रास आठवला की नको वाटत पुन्हा बाळ.. तुला काही झालं तर?

काही होणार नाही मला.. तेंव्हा किडकिडीत काडी (बारीक ) होते मी आता बघ कशी हेल्दी झालेय.. आपण पुन्हा चान्स घेऊया न प्लिज… ok… पण तुला कधी असं वाटलं की नको हे तर… नाही.. असं नाही होणार.. मी मानसिक व शारीरिक तयार आहे..


दोघांनीही सेकंड चाईल्ड च प्लॅनिंग सुरु केल… त्यामुळे की काय.. समीक्षाची पाळी (mc ) तारखेच्या पाच.. सहा दिवस लेट होऊ लागली.. एक महिना.. दोन महिने…. करता करता.. वर्ष निघून गेलं.. आता समीक्षाची पाळी जास्तच अनियमित होत होती.. कधी सहा.. तर कधी दहा दिवस लेट..

आणि दोन.. तिन महिन्याआड . आपण प्रेग्नेंट आहोत म्हणून ती घरीच किट आणून चेक करायची.. पण रिझल्ट निगेटिव्ह होता.. यातच दीड वर्ष झाल.. वजन जास्त वाढत होत.. आणि सगळं ठीक आहे.. पाहिलं बाळ आपल्याला लवकरच झालं मग आता हा प्रॉब्लेम का येत आहे. या विचाराने ती मानसिक तणावात राहत होती..

अर्णव झाल्यावर एकदा तीने ऍबॉर्शन केल होत.. नकोच होत न तेंव्हा बाळ त्यांना.. आणि अर्णव देखील दोनच वर्षाचा होता.. त्यामुळे तिने ते पाऊल उचललं होत.. आणि त्या वेळी तो निर्णय योग्य देखील होता.. पण.. आता

आता जेंव्हा तिची स्वतःची इच्छा आहे पुन्हा आई व्हायची तर असं का होत आहे? अर्णव देखील आठ वर्षाचा होत आला होता.. तो सहा वर्षाचा असताना घेतलेला दुसऱ्या चान्स चा निर्णय अजूनही पूर्णत्वास आलेला नव्हता.. दोन वर्ष निघून गेली.. आता दोन मुलांन मध्ये अंतर आठ वर्षाचं होईल… असा विचारही तिच्या मनात डोकावू लागला होता..

या सर्वांपेक्षा आपण “पुन्हा आई होऊ नाही शकत” याची खंत जास्त होती समीक्षाला.. “आपण ते बाळ ऍबॉर्ट केल म्हणून असं होत असेल का आपल्या सोबत..? माझ्यात काय कमी आहे? डॉक्टर कडे गेले तर दोघांचाही चेकअप करावा लागेल.. नको नको त्या टेस्ट सांगतील डॉक्टर..

जेंव्हा पदरात बाळ आपोआप आल होत ते याच हाताने गमावलं मी.. आणि आता दोन वर्ष झालीत.. बाळ होण्यासाठी प्रयत्न करूनही बाळ होत नाही आहे.. ” या विचाराने समीक्षा चिडचिडी झाली होती.. राघव म्हणायचा “तसंही आपल्याला दुसरं बाळ नकोच होत न. मग नाही होत तर टेन्शन कशाला घेतेस..

समीक्षा आता ऐकायला तयार नव्हती.. “माझ्यात अशी कोणती कमी झाली जे मी आई नाही होऊ शकत? ” हा प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हता..
आणि तिने सर्व टेस्टला सामोरे जाण्याची तयारी दाखवली.. पण “मला पुन्हा आई व्हायचं आहे” हा ध्यास तिने सोडला नाही..

नॉमिनल टेस्ट झाल्या सर्व रिपोर्ट नॉर्मल आले….
राघवचे पण टेस्ट झाले.. तेही नॉर्मल.. मग का आपल्याला बाळ होत नाही आहे.. अर्णव असूनही समीक्षाला वांझोटे पणाची सल जाणवत होती.. आपली कूस वांझ कशी होऊ शकते?

आपण एकदा.. मिळालेली संधी धुळकावली … त्याचा तर हा परिणाम नाही न.. देव आपल्याला शिक्षा तर देत नाही न… या सगळ्यां विचाराने ती फार मानसिक तणावात आली होती..

कारण ज्या गर्भनिरोधक साधनांचा वापर करून असा प्रॉब्लेम होतो.. त्यापैकी त्यांनी एकही वापरलेलं नव्हतं.. त्यामुळे औषधांचा साईडइफेक्ट होण्याचा प्रश्नच नव्हता.. त्यामुळे नेमक कारण कोणत हे शोधण्याकडे तिची जिद्द लागली होती..

वयाची तिशी पार झाली होती.. वयामुळे असा प्रॉब्लेम येत नाही कारण तिच्या दोन मैत्रिणींचे लग्न तिशी पार केल्यावर झाले.. आणि लगेच एक वर्षात त्यांना मुल पण झालं.. त्यामुळे विचार करून करून.. हिच्या डोक्याचा भुसा होत होता…

शेवटचा उपाय म्हणून पुन्हा डॉक्टर बदलवला… आणि नव्याने सुरुवात केली पुन्हा.. पण आई होण्याचा विचार समीक्षाने सोडला नाही.. यावेळी.. डॉक्टर ने.. पोटाचा x-rey करायला सांगितला.. हा शेवटचा उपाय होता.. समीक्षा मधली उणीव शोधण्याचा..

आणि नेमक तेच झालं.. गेली तिन वर्ष प्रयत्न करूनही.. प्रेग्नेंट न होण्याचं कारण कळलं.. समीक्षाच्या दोन्हीही गर्भ नलिका ब्लॉक झाल्या होत्या..Bilateral tubual blok.. right And left (both)

हे.. असं होण्याचं महत्वाचं कारण काय? यावर उपाय काय? हे विचारण्यासाठी डॉक्टर कडे दोघेही गेले तेंव्हा कळलं.. “या(both tubual blok) नलिका ब्लॉक असल्यामुळे समीक्षा आई होऊ शकत नाही…

आणि या ब्लॉक होण्याचं कारण म्हणजे अनियमित पाळी.. आणि पाळी आल्यावरही ती भरपूर न जाणे.. (कमीत कमी तिन दिवस तरी जायला हवी ) त्यामुळे त्या बाहेर न जाणाऱ्या ब्लडचा काही भाग हा गर्भनलिकेमध्ये जाऊन जमा झाला आणि या दोन.. तिन वर्षात त्या (समीक्षाच्या) नलिका पूर्णतः ब्लॉक झाल्या..

पण यावर उपाय आहे.. त्या गर्भनलिका साफ करता येतात.. ते ब्लॉक काढता येतात व समीक्षाला पुन्हा आई होता येऊ शकत.. ” डॉक्टर च्या बोलण्यामुळे थोडं वाईट वाटलं समीक्षाला आणि आठवलं “पाळी एकच दिवस असायची तर आपल्याला किती बर वाटायचं.. चला टेन्शन नाही.. तिन -चार दिवसच..”

पण ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास वाटत होता “पाळी”चा त्याच गोष्टीमुळे आज आपल्याला एक मुलं असूनही वांझोटेपणाची जाणीव होत होती की मी “पुन्हा आई होईल की नाही? “

पुन्हा आई होऊ शकेल की नाही या विचारात तिला झालेला मानसिक त्रास व मी आलेली संधी का सोडली (ऐबॉर्शन … का केल )… या मुळे तिला वेड लागायची वेळ आली होती…


बऱ्याच स्त्रियांचं होत न असं.. पाहिले बाळ झाले की दुसरं नको वाटत (पहिल्यां प्रेग्नेंसी मधे /डिलेव्हरी मधे आलेल्या अडचणी ) आणि अशातच दुसरं राहून जरी गेलं (प्रेग्नेंट ) तरी नको म्हणून ते ऐबॉर्ट केल जात… नंतर वय वाढत (तिशी पार ), Bp, शुगर, थायरॉईड, पाळीची अनियमितता आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या यामुळे…. पहिल्या बाळा नंतर पाच.. सहा वर्षांनी दुसरा चान्स घ्यायला गेलं की (बऱ्याच स्त्रियांना ) मग दुसऱ्यांदा आई होण्यासाठी प्रॉब्लेम होतो..

त्यामुळे जर दोन बाळ हवे असतील तर प्लीज लवकर होऊ द्यावे (तीन -चार वर्षाच्या अंतराने ) नाहीतर तुम्हाला मानसिक व टेस्ट मुळे शारीरिक त्रास देखील होतो.. मी फक्त माझ मत मांडतेय… शेवटी प्रत्येकाची इच्छा एक किंवा दोन मूल होऊ देण्याची..

मी लिहिलेली कथा बऱ्याच स्त्रियांची आहे… पण त्या ते स्वीकारत नाही व “आम्हाला एकच बाळ हवं होत असं म्हणतात “काही अपवाद असतील.. पण माझ्या बघण्यात बऱ्याच जणी आहेत ज्यांना दुसरं बाळ होण्यात प्रॉब्लेम येतोय आणि त्यांची इच्छा आहे पुन्हा आई होण्याची.. मग आर्थिक बाबी आणि मूल बघायला कुणी नाही या बाबी गौण ठरतात..

माझा लेख “आई मी एकटा का आहे..? ( सिंगल चाईल्ड) ” या लेखावरील काही प्रतिक्रिया वाचून हा लेख लिहिला आहे मी. तेंव्हा कुणावरही जबरदस्ती नाही दुसरं बाळ होऊ द्या.. किंवा इतक्या टेस्ट करून त्रास सहन करून पुन्हा एकदा आई व्हा..

त्या लेखावरील प्रतिक्रियेवरून मला हे लिहावंसं वाटल.. बऱ्याच स्त्रियांची इच्छा असते पुन्हा आई होण्याची पण “अंतर वाढलं.. आता प्रयत्न करूनही प्रेग्नेंट होत नाही.. मग पाहिलं असताना चेकअप कशाला करायचा.. ” अशा गोष्टीमुळे स्त्रिया आपली इच्छा मनातच ठेवतात.. आणि आम्हाला एकच बाळ हवं होत यावर समाधान मानतात.. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.. आणि निर्णय…

आवडल्यास like करा.. शेअर करा पण नावासहित.. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.. तुमच्या प्रतिक्रियेमुळे हुरूप येतो लिखाणाचा.. स्त्रियांचं मन उलगडण्याचा लिखाणातून..

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here