उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे

0
363

उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे.

ग्लोबल न्यूज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबद्दल आजतागायत फक्त विरोधी पक्षातील भाजपा नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे यांचे चुकलात भाऊ, माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात.

मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात”.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आले होते. त्याच वेळी मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील समन्वयाचा सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असे वाटते. या सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर पडेल, असं वाटत असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असेल हे मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून सांगितलं आहे. माझ्या हातात सत्ता आल्यावरच महाराष्ट्र कसा असावा ते दाखवता येईल. त्याशिवाय महाराष्ट्र कसा घडवता येईल? जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविणे हे माझं स्वप्न आहे.

त्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यायला हवा, असं सांगतानाच मला जे वाटतं ते आताच्या सरकारमधील लोकांना सांगून काय उपयोग. ते त्यांच्या पद्धतीने सत्ता राबवत आहेत. माझ्या मतानुसार त्यांनी काही करावं, अशी अपेक्षा करणं योग्य  नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here