सोलापूर शहरात रविवारी पॉझिटिव्ह रूग्णांची शंभरी पार, 3 जणांचा मृत्यू

0
185

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना वाढ काही केल्या थांबल्याचे नाव घेईन झाली आहे.आज रविवारी एकूण 588 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 486 अहवाल निगेटिव्ह आले असून 102 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात 61 पुरुष तर 41 महिलांचा समावेश होतो .आज 111 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 27 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज 3 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3804 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 325 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1377 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2102 इतकी समाधानकारक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here