बार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

0
725

बार्शी तालुक्‍यात गुरुवारी 434 अहवाल निगेटिव्ह तर 109 कोरोना पॉझिटिव्ह

बार्शी : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याचा परिणाम तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा देखील वाढू लागला आहे. बुधवारी 549 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 109 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील 48 तर ग्रामीणमधील 61 असे रुग्ण असून बाधितांची संख्या 3 हजार 735 झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनामुक्त होऊन 2 हजार 577 जण घरी गेले आहेत. 128 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 

शहरातील 286 व ग्रामीणमधील 361 असे 549 अहवाल प्राप्त झाले आहे. शहरातील 406 व ग्रामीणमधील 84 असे 490 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 68 तर ग्रामीणमधील 60 अशा 128 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 103 तर ग्रामीणमध्ये 112 अशा 215 जणांवर उपचार सुरु आहेत. आजवर शहरात 2 हजार 262 तर ग्रामीण भागात 1 हजार 473 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 
ग्रामीण भागात चिखर्डे, पानगाव, फफाळवाडी, उपळाई, गाडेगाव, ताडसौंदने, शेंद्री, खांडवी, आगळगाव, आळजापूर, झाडी, गौडगाव, मालवंडी, अलीपुर, भातम्बरे, रातंजन व मळेगाव या गावात

तर शहरातील
सुतार नेट, वायकुळे प्लॉट, हनुमान रोड, बारंगुळे प्लॉट, सुभाष नगर, शिवाजी नगर सिद्धेश्वर नगर, कैकाडी चाळ, माळे गल्ली, ढगे मळा, संभाजी नगर, स्वराज कॉलनी कापसे बोळ, सोलापूर रोड, दत्त नगर अलीपुर रोड, उपळाई रोड कुर्डुवाडी रोड, वाणी प्लॉट कोस्टे गल्ली, पोलीस कॉलनी, गाडेगाव रोड फुले प्लॉट, कासारवाडी रोड राऊत चाळ, पाटील प्लॉट चव्हाण प्लॉट या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here