तुझ्या वडिलांना मुख्यमंत्र्याची खुर्ची कशी मिळाली, कंगनाची मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका …..!

0
1154

तुझ्या वडिलांना मुख्यमंत्र्याची खुर्ची कशी मिळाली, कंगनाची मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका …..!

सध्या राज्यात सुशांत सिह राजपूत प्रकरणात राज्याचे वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे राजपूत प्रकरणावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारवर चिकलफेक करण्यास सुरवात केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यातच आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रक काढून लगावण्यात आलेल्या आरोप[याचे खंडन केले आहे. मात्र हाच धागा पकडत सिनेअभिनेत्री कंगना रणौतने ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ती म्हणाली, गलिच्छ राजकारणाबद्दल कोण बोलतय बघा. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कशी मिळाली हा गलिच्छ राजकारणाच्या अभ्यासाचा विषय आहे सर. हे सगळं विसरा आणि आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरं तुमच्या वडिलांना द्यायला सांगा.

गेले काही दिवस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत याची केस अखेर सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. केंद्राने बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारसीची मागणी मंजूर केली आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वकिलांनी ही माहिती दिली. आता या केसची सीबीआय चौकशी होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here