आजचे : आजचे पंचांग – Today’s Horoscope 29 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
वार – गुरूवार.
29-12-2022
शुभाशुभ विचार- 14 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- मध्यम दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 11.44 पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा.
चंद्र राशी – मीन.
—————————————-

आजचे राशिभविष्य
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
खर्चाचे प्रमाण कितीही वाढले तरीही पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. प्रवासात असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्यायला हवी.
वृषभ (शुभ रंग- निळा)
पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणे लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल आज दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.
मिथुन ( शुभ रंग- केशरी )
नोकरदारांना वरिष्ठानचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट घेण्याची तुमची आज तयारी असेल.
कर्क (शुभ रंग- जांभळा)
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज थोडासा विरोधी दिवस आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागेल.
सिंह (शुभ रंग- पिस्ता )

आज फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. गाडी काळजीपूर्वक चालवा.
कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे उल्लंघन करू नका. सतर्क रहा.
Covid News : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली कोविड टास्क फोर्सची बैठक
तूळ ( शुभ रंग- भगवा )
कार्यक्षेत्रात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीत नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक आवश्यक आहे.
वृश्चिक (शुभ रंग- पांढरा )
आज तुमचा हौस मौज करण्याकडे कल राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.
धनु- (शुभ रंग- आकाशी )
स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते मार्गी लागू शकतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.
मकर ( शुभ रंग- चंदेरी )
आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर मात्र वाद टाळलेले बरे.
कुंभ (शुभ रंग – क्रीम )
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा ही सहजच उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.
मीन -(शुभ रंग – गुलाबी )
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना योग्य स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. इतरांच्या भानगडीत यशस्वी मध्यस्थी कराल.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424