इनरव्हील क्लब बार्शीच्या अध्यक्षपदी हेमा कांकरिया तर सचिवपदी गुंजन जैन यांची निवड
बार्शी : येथील इनरव्हील क्लब ही संघटना 29 वर्षांपासून बार्शी शहरात कार्यरत आहे. या संघटनेमार्फत महिलांसाठी व समाजासाठी विविध उपक्रम राबविले जातात. रविवार दि. 5 जुलै 2020 रोजी झालेल्या मिटिंग मध्ये नूतन पदाधिकारीची निवड एकमताने झाल्याची माहिती पत्रकातुन देण्यात आली.


नुतन अध्यक्ष हेमा कांकरिया म्हणाल्या , या माध्यमातून महिलासाठी जनजागृती करणे, सबलीकरण करणे, कार्यशाळा भरवणे, आरोग्य शिबीर भरवणे तसेच समाजातील गरजू लोकांसाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रम, पर्यावारणाशी निगडीत उपक्रम, प्लास्टिक विषयी जनजागृती करणे असे उपक्रम घेण्याचा मानस आहे.
नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष – सौ. हेमा कांकरिया
सचिव – गुंजन जैन
उपाध्यक्ष – सौ. मंजु झंवर
कोषाध्यक्ष – सौ. गौरी रसाळ
आय. एस. ओ. – शिल्पा सरवदे
एडिटर – सौ. मोना गुंदेचा
सहसचिव – सौ. कल्याणी तम्मेवार
सी. सी. सी. – प्रमोदिनी कोठारी