दत्तवाडीतील ‘तो’ खून प्रेमप्रकरणातून ; मुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरून घातल्या गोळ्या-

0
211

दत्तवाडीतील ‘तो’ खून प्रेमप्रकरणातून ; मुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरून घातल्या गोळ्या-

पुणे – येथील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आरोपीच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून हा खून झाला असून दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अमित मिलिंद सरोदे (वय २१) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ महेश मोहोळ (वय २१) याने पोलिसात तक्रार दिली होती. आदर्श ननावरे (वय २२) बोंबल्या ऊर्फ अभिषेक काळे आणि यशवंत कांबळे (वय ४८) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यशवंत कांबळेच्या मुलीसोबत अमित सरोदेचे प्रेमसंबंध होते. यशवंत कांबळेला ते मान्य नव्हते.मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यासाठी यशवंत कांबळेने अमितला वारंवार समजावले.

परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे रविवारी रात्री अमित सरोदे हा मित्रांसोबत दत्तवाडी परिसरातील शाहू वसाहत येथे उभा होता. त्यावेळी आरोपी आदर्श ननावरे आणि बोंबल्या त्या ठिकाणी आले.ननावरेने अमितवर थेट गोळ्या झाडल्या तर बोबंल्याने त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अमित सरोदेचा जागीच मृत्यू झाला.

खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार केले.काही तासात आरोपींना अटकही केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत यशवंत कांबळेच्या सांगण्यावरून त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here