
ह.भ.प. ऍड. जयवंत महाराज बोधले यांना
पी.एचडी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान
बार्शी: श्री क्षेत्र धामणगांव येथील श्री. संत माणकोजी महाराज बोधले यांचे ११ वे बंशज ह.भ.प अँड. जयवंत महाराज बोधले यांनी सोलापूर विद्यापीठात “ज्ञानोत्तर भक्ती-स्वरुप व सामाजिक उपयुक्तता” (वारकरी संप्रदाय संताच्या विशेष संदर्भात) ‘तत्वज्ञान’ या विषयातील, घटकावर संशोधन पर प्रबंध सादर केला होता.

या संशोधन पर प्रबंधाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ह.भ.प. अँड जयवंत महाराज
बोधले यांना पीएचडी. विद्या वाचस्पती) ही पदवी प्रदान करण्यात आली.
ह.भ.प.अॅड. जयवंत महाराज बोधले हे बार्शी तालुक्यातील धामणगांव येथील असून श्री संत माणकोजी महाराज बोधले यांची अध्यात्मिक परपरा सदगुरु श्री प्रभाकर दादा बोधले
महाराज यांच्या आशिर्वादाने ते पूढे चालवित आहेत त्यांचे अध्यात्मिक शिक्षण मुमुक्षु पाठशाळा पंढरपूर येथे गुरुवर्य हरीभाऊ महाराज पाटील यांच्याकडे वेदांतशास्त्राचे अध्ययन केले आहे.

तसेच ऋषीकेश’ येथे ही त्यांनी ब्रम्हसूत्रांचे अध्ययन केले आहे.
वयाच्या ११ व्या वर्षापासून ते किर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम करीत आहेत. त्यामध्ये गेली १७ वर्ष बाशीचे ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरात विविध अध्यात्मिक विषयावरील त्यांची प्रवचन सेवा सुरु आहे. त्याचबरोबर वेराग, नागपूर येथे सुध्दा प्रतिवर्षी प्रवचन करतात
महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेश या ठिकाणी सुध्दा त्यांचे किर्तन प्रवचनाचे कार्यक्रम सतत होत आहेत. तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका ‘दुबई’ येथे सुध्दा फडकवली
आहे. त्यांनी या अध्यात्मिक पंरपरा जोपासत शिवाजी विद्यापीठातून एम.ए. तत्वज्ञान तसेच विधी शाखेची एल.एल.वी. ही पदवी प्राप्त केलेला आहे.
विशेष म्हणजे ह.भ.प. अँड जयवंत महाराज बोधले यांची महाराष्ट्र शासनाने ‘ज्ञानोबातुकाराम पूरस्कार’ या निवड समितीवर नियुक्ती केलेली आहे. अध्यात्मिक व सामाजिक
पंरपरा जोपासताना ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वाना सुपरिचित आहेत.
सदरील पी एचडी. करिता प्रा.डॉ. भाऊसाहेब काळे हे मार्गदर्शक होते. तसेच प्रा. डॉ. रजनीताई जोशी आणि प्रा-डॉ. अबोली सुलाखे यांचे सहकार्य लाभले. गुरुवर्य अॅड. श्री. जयवंत महाराज बोधले यांना पी.एचडी. (डॉक्टरेट) हो सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल बाशीतील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
