या सरकारचं डोकं सरकलंय की काय ? भाजप नेत्याचा सवाल
सध्या वकोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. त्यातच मुंबई आणि पुण्याहून इतरत्र जाणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. मात्र आता हाच नियम बृहमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त चहल यांनी मुंबईत येणाऱ्यांना सुद्धा लागू केल्यामुळे आता नवा वाद निर्माण झालेला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांना राज्य सरकारने नुकतीच क्वारंटाइन कालावधीत सवलत दिली आहे. त्यांचा १४ दिवसांचा कालावधी १० दिवसांवर आणला आहे. मात्र, त्याच चाकरमान्यांना मुंबईत परतल्यानंतर १४ दिवस घरात राहावे लागणार आहे. नीलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला टोला हाणला आहे. ‘ह्या सरकारचं डोकं सरकलंय की काय असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.