अभिनेत्री प्रिया बेर्डे सह हे अर्धा डझन सेलिब्रिटी करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश; तारीखही ठरली

0
349

ग्लोबल न्यूज – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून पडद्यामागील कलाकारांसाठी मदतीचे काम सुरु होते. आता या माध्यमातून अधिकृतपणे काम करण्यात येणार आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार आहे. प्रिया बेर्डे सध्या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे आपण पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here