बार्शीत दररोज कोरोनाचे दररोज अर्धशतक सुरूच: गुरुवारी तालुक्यात ४९ बाधित रुग्ण वाढले

0
605

बार्शीत दररोज कोरोनाचे दररोज अर्धशतक सुरूच: गुरुवारी तालुक्यात ४९ बाधित रुग्ण वाढले

बार्शी: बार्शी तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून गुरुवार दि १३ ऑगस्ट रोजी तब्बल ४९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एक मयतची नोंद झाली आही गेल्या काही दिवसात विशेष म्हणजे ग्रामिण पेक्षा बार्शी शहरात ग्रामीण कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज आलेल्या अहवाला बार्शीतील भीमनगर येथे सर्वाधिक ८ तर धारुरकर बोळ येथे ५ बाधित रुग्ण आढळले तसेच शहरातील सुश्रुत हॉस्पीटल १, धर्माधिकारी प्लॉट १, बारंगुळे प्लॉट १, नाळे मळा सोलापुर रोड १, भवानी पेठ ४, मंगळवारपेठ २, गाडेगाव रोड २, जैन मंदीर २, अलीपुर रोड २, नाळे प्लॉट २, वाणी प्लाट २, लक्ष्मी नगर १, हनुमान रोड १,

लोकमान्य चाळ १, टाकणखार रोड १, शिवशक्ती मैदान १, कसबा पेठ १, भिसे प्लॉट १, मुरलीधर मंदीरजवळ १ असे ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर ग्रामिण भागात वैराग ३, शेळगाव १, आगळगाव २ ,श्रीपत पिंपरी १, ढेंबरेवाडी १ असे ८ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुक्यात ४९ रुग्ण आढळले आहे.

यामुळे तालुक्यात एकुण बाधित संख्या १४५८ झाली आहे यापैकी ९९७ रुग्ण बरे झाले तर केवळ ४०९ रुग्णावर उपचार सुरु आहेत . तर आजवर ५२ कोरोना बाधित रुग्ण दगावले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here