मुंबई सुरक्षित नाही’ म्हणणाऱ्या मिसेस फडणवीसांना रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला

0
587

फडणवीस मुख्यमंत्री असते तर असे वक्तव्य केले असते का? – रेणुका शहाणे

मुंबई सुरक्षित नाही’ म्हणणाऱ्या मिसेस फडणवीसांना रेणुका शहाणेंचा सणसणीत टोला

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सिनेअभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत होत्या. त्यातच आता मिसेस फडणीवसांच्या या वक्तव्याचा अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे . तसेच त्यांना सणसणीत टोला सुद्धा लगावला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला राजकीय मुद्दा करु नका. तसंच मुंबई आणि येथील नागरिकांसाठी कोणताही अपशब्द वापरू नका. जर तुमच्याकडे क्षमता आणि ताकद असेल तर त्याचा वापर पोलिसांची मदत करण्यासाठी करा.

जर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर असं वक्तव्य केलं असतं का? एक लक्षात असू द्या देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना एल्फिन्स्टन पूलदेखील कोसळला होता. त्यात मुंबईतील अनेक जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, त्यावेळी मुंबईत राहणं असुरक्षित आहे किंवा मुंबईमध्ये माणुसकी नाहीये वगैरे असं कोणतंच ट्विट केलं नव्हतं?” असा सवाल त्यानीं विचारला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here