बार्शी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्य वतीने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बार्शीचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ यांचा पत्रकार दिनानिमित्त बुधवारी (ता.6) दुपारी राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी ,लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर ज्येष्ठ पत्रकार योगेश जाधव, , संघाचे मार्गदर्शक संजय भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकूलोळ यांनी शहर व परिसरातील कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातलगांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन वेळचे मोफत जेवण दिले. तसेच ऊस तोड मजूर, कामगार गरजूंना दोन वेळ जेवणाची सोय शहरातील मध्यवर्ती भागातील जैन स्थानकात केली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असलेले मास्क, सॅनिटायझर, कोव्हीड शिल्डचे मोफत वाटप केले. लॉड डाऊनमुळे शहर व परिसरात पोलीस व महसूल प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोव्हीड प्रतिबंधित क्षेत्रात अडकलेल्या गरजूंना मदत केली.
किल्लारी भूकंप, कोल्हापूर, सांगली परिसरातील महापूरात अडकलेल्या गरजूंना आपदकालीन मदत घटनास्थळी जाऊन पोहचवली. तसेच रक्तदान चळवळ व्यापक करण्यासाठी विशेष प्रयत्न केले व ऐच्छीक रक्तदाते निर्माण करत रक्तदान चळवळीला गती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये सामाजिक व पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या कामाची योग्य दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने कुंकूलोळ यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते झालेल्या गौरवामुळे कुंकूलोळ यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
—