तरुणांसाठी खुशखबर: ठाकरे सरकार करणार १०,००० हजार पोलिस पदाची भरती

0
314

तरुणांसाठी खुशखबर: ठाकरे सरकार करणार १०,००० हजार पोलिस पदाची भरती

कोरोनाच्या वाढत्या संकटात बेरोजगारांची संख्या आणि नोकरीच्या कमी संधी उपलब्ध होत असताना महावीस आघाडी सरकारने राज्यतील तरुणांना नोकरी संदर्भात आनंदवार्ता दिलेली आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलातील १०,००० रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राज्यतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी तसेच अपुऱ्या पोलीस दलावर पडत असलेला ताण कमी करण्यासाठी राज्यात पोलीस भरती करण्याचा निर्णय गृहविभागातर्फे घेण्यात आलेला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंत्रालयात झालेल्या या बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here