आनंदाची बातमी : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन,ICMR ची मान्यता

0
203

Good News : अवघ्या ६५० रुपयांना मिळणार कोरोना निदान किट, IIT दिल्लीचं संशोधन

नवी दिल्ली, १६ जुलै : कोविड रुग्णाची तपासणी करण्यासाठी कमी खर्चाची कोविड चाचणी किट्स आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी तयार केली आहे. त्याला भारतीय संशोधन परिषदेची (ICMR) मान्यता दिली आहे. या कोविड किट्सचे लोकार्पण केंद्रीय मानव संसाधन मंत्री रमेश पोखरीवाल निशंक तर केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोलामधून ऑनलाईन केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मेक इन इंडिया मोहिमे अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या किटची किंमत केवळ ३९९ रुपये इतकी माफक आहे. मात्र बाजारातील विक्रीवेळी या निदान किटची किंमत ६५० रुपये राहील.

तसेच या निदान किटच्या माध्यमातून अवघ्या ३ तासांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळवता येईल, असा दावा आयआयटी दिल्लीने केला आहे.

यामध्ये जर या निदान किटला यश आले तर देशाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बाब ठरणार आहे.

आयआयटी दिल्लीने विकसित केलेल्या निदान किटची निर्धारित किंमत ३९९ रुपये, आरएनए किट १५० रुपये आणि बाजारातील किंमत ६५० रुपये अशी असणार आहे.

शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नामुळे ही किट निर्धारित वेळेत तयार झाली असून हे एक क्रांतीकारी काम असल्याचे त्यांनी सांगुन सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. नागरिकांनी पुढे येऊन आपल्या कोविडबाबतच्या चाचण्या करुन घ्याव्या असे आवाहनही धोत्रे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here