Good News :पंढरपूर तालुक्यातील ४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0
80

Good News :पंढरपूर तालुक्यातील ४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

पंढरपूर- शहर व तालुक्यात आजवर ६ कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आरोग्य विभागाने पंढरपूर, उपरी , गोपाळपूर तसेच चळे, कासेगाव आरोग्यकेंद्र व पंढरपूरमधील उपजिल्हा रूग्णालय येथून ४७ जणांचे स्वँब नमुने तपासणीसाठी घेतले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याचा अहवाल आला असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. शहर व तालुक्यात रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. पंढरपूर शहरातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तिंचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.