गौंडरे हादरले! चिमुकल्या मुलासह आईची आत्महत्या? –

0
107

गौंडरे हादरले! चिमुकल्या मुलासह आईची आत्महत्या? –


करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गौंडरे येथे एका विवाहितेने मुलासह पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजली दत्तात्रय आंबारे (साधारण वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुलाचे नाव समजू शकलेले नाही. घरापासून काही अंतरावर ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समजली असून नेमकी ही आत्महत्या की हत्या हे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गौडरे येथे मंगळवारी (ता. २८) तारखेला विवाहितेने आत्महत्या केली. विवाहितेची पती दत्तात्रय आंबारे हे गवंडी काम करत असल्याचे समजत आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा गावात अंगणवाडीत जातो तर दुसरा लहान मुलगा आहे. त्यातील एक मुलगा व आई यांनी पेटून घेऊन आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याचे कारण अद्याप समजले नाही. घटनेची माहिती समजताच डॉ. हिरे व कोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. याचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक कोकणे यांनी सांगितले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here