ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले अखेर अमेरिकेला रवाना

0
143

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले अखेर अमेरिकेला रवाना

ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला रवाना झाले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज पहाटे ते मुंबईहून अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले. काही महिन्यापूर्वी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार आहेत.

स्कॉलरशिप जाहीर झाल्यानंतर डिसले यांनी शैक्षणिक रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिक्षण विभागाकडून मोठा त्रास देखील त्यांना सहन करावा लागला. अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मध्यस्तीनंतर डिसले यांची शैक्षणिक रजा मंजूर झाली. मात्र दुसरीकडे डिसले यांची चौकशी सुरुच होती. रणजितसिंह डिसले हे आपल्या प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर होते असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व त्रासाला कंटाळून जुलै 2022 मध्ये डिसले यांनी आपल्या उपशिक्षक पदाचा राजीनामा देखील दिलेला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. यानंतर 2 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आरोप, चौकशी इत्यादीच्या फेऱ्यानंतर रणजितसिंह डिसले अखेर अमेरिकेला रवाना झाले आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली. नाविन्यपूर्ण काम करत रहा अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्याची माहिती डिसले यांनी ट्विटरद्वारे दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here