गौडगावचे जवान रामेश्वर काकडे नक्षली हल्ल्यात शहिद
गौडगाव : छत्तीसगड मधील रायपुर येथे झालेल्या चकमकीत बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे राहणारे बीएसएफ जवान रामेश्वर वैजनाथ काकडे हे शहीद झाले आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


दरम्यान याबाबतची माहिती बुधवारी रात्री उशिरा काकडे कुटुंबियांना सैन्य दला मार्फत देण्यात आली आज गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शहीद जवान रामेश्वर काकडे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद जवान रामेश्वर काकडे हे २०१२ साली जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील बॉर्डरवर आपली सेवा बजावली होती. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.