काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी जयहिंद शुगरचे गणेश माने देशमुख यांची निवड

0
186

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी गणेश माने देशमुख यांची निवड

अक्कलकोट : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांना प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी माने देशमुख यांनी पक्षात प्रवेश केला होता.नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. त्याठिकाणी युवा नेत्रुत्वाने मोठे यश संपादित केल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीकडून युवा नेतृत्वांना सामावून घेत पक्षाचा विस्तार केला आहे. यामध्ये जयहिंद शुगर्सच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हितासाठी माने देशमुख यांनी  सातत्याने अनेक उपक्रम राबविले आहेत.  तसेच सामाजिक बांधिलकीतुन जिल्ह्यात माने देशमुखांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या माध्यमातुन जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल यादृष्टीने प्रदेश सचिवपदी माने देशमुख यांची निवड व्हावी, यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत प्रदेश कमिटीकडून यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. माने देशमुख यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याने आगामी काळात पक्षाला मोठा फायदा होईल, असे जाणकारातुन बोलले जात आहे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here