तब्बल चारशे किलोमीटर दूर जाऊन अशाप्रकारे केले जातात अंत्यसंस्कार ; वाचून तुम्ही हैराण व्हाल..

0
1049

या भूतलावरील जन्म घेतलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. हे सत्य असले तरी मृत्यू हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. आत्मा शरीरातून बाहेर जाताच त्या शरीराला काहीच महत्त्व उरत नाही. जिवंत अवस्थेत, लोक त्या शरीरावर किती प्रेम करतात, किती जवळीक साधतात, परंतु जेव्हा तो आत्मा शरीर सोडतो आणि त्याच्या परम निवासस्थानाकडे जायला निघतो, तेव्हा त्या शरीराचे हे आकर्षण हे देखील नाहीसे होते.मनुष्याचा जन्म झाल्यापासून ते अंतिम प्रवासापर्यंत त्यांच्यावर विविध प्रकारचे संस्कार केले जातात. त्यातील शेवटचा संस्कार म्हणजेच अंत्यसंस्कार होय.

नातेवाईक आणि इतर जवळचे लोक शक्य तितक्या लवकर शरीरावर अंत्यसंस्कार करण्यास बांधील होऊन जातात. मृताच्या शरीरावर अंतिम संस्कार करण्याची प्रथा प्रत्येक धर्मात वेगवेगळी आहे. ज्याप्रमाणे हिंदू आणि शीख धर्मात देहाला जाळून अंत्यसंस्कार केले जातात तसेच इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक देहाला पुरतात, परंतु पारसी धर्मात थोडे वेगळे आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात.या समाजातील लोकांचे आयुष्यमान देखील सर्वांपेक्षा जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर ‘दोखमेनाशिनी’ साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात म्हणजे गिधाडांना खायला सोडतात.

टॉवर ऑफ सायलेन्स – भारतातील बहुतेक पारशी लोक मुंबई शहरात राहतात, जे टॉवर ऑफ सायलेन्सवर आपल्या नातेवाईकांचे अंतिम संस्कार करतात. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.

पूर्वी ही स्मशान भूमी अत्यंत शांत भागात असायची. परंतु जसजसे शहरीकरण वाढत गेले तसतसी शांतता ही राहिली नाही. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली.

त्यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधी साठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते.

निसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. मात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत.

काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर असेच लेख मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक किंवा follow करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here