सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोनाचे भीतीदायक वातावरण:बुधवारी 394 नवे रुग्ण,20 मृत्यू

0
267

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी दि.9 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 394 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये 234 पुरुष तर 160 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 272आहे. आज 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 3645 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3251 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 916 इतकी झाली आहे. यामध्ये 9076 पुरुष तर 5840 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 439 जणांचा मृत्यू झाला आहे यात 300 पुरुष तर 139 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 522 आहे .यामध्ये 2 हजार 843 पुरुष तर 1679 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 955 यामध्ये 5933 पुरुष तर 4022 महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here