बार्शीतील सात दुकानातील चोरी प्रकरणी मुंबई येथुन चौघांना अटक,गुन्ह्यातील गाडी केली जप्त

0
54

बार्शीतील सात दुकानातील चोरी प्रकरणी मुंबई येथुन चौघांना अटक,गुन्ह्यातील गाडी केली जप्त

बार्शी : बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत एका रात्रीत सात दुकाने फोडल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी ४८ तासाच्या आत मुंबई येथील चौघांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीसह मुंबई मधुन अटक केले.ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर व पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मारूती दासर वय. २७ रा. हनुमान नगर महापे ठाणे बेलापुर नवी मुंबई ,महेंद्र उर्फे मोटया अविनाश पाटील वय. २५ रा. हनुमान नगर ठाणे बेलापुर रोड नवी मुंबई ,अभिजीत कांबळे वय.२४ रा. सेक्टर ५ कोपरखैरणे , नवी मुंबई व अजय कानगुलकर वय.२२ रा. गणेश पंचमी सोसायटी नवी मुंबई अशी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

२८ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे ३ते ५ च्या सुमारास बार्शी शहरातील गणेश कानडे यांचे महावीर मार्ग बार्शी येथिल होलसेल जिन्स, अमित आपटे यांचे जुनी चाटे गल्ली येथिल आपटे मेडिकल,प्रविण राठोड यांचे पांडे चौक बार्शी येथिल सुरज गारमेंट ,अनाराम चौधरी यांचे महावीर मार्ग येथिल पिकॉक लाईफ स्टाईल, गौस म. रफीक तांबोळी यांचे राउळ गल्ली टाकणखार रोड येथिल जी.एम.ट्रेडर्स ,रणजित अंधारे याचे तेलगिरणी चौकातील रोहीत एजन्सी तेल दुकान ,संदिप बगले याचे मेडीकल दुकानाचे शटर उचकटुन अडीच लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता.

अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी सी.सी.टि.व्ही.फुटेजच्या आधारे दोन पथके नेमुण तपास सुरू केला.पुणे,लातुर, सोलापुर या भागात तपास चालु असताना मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयाच्या तपासात मुंबई येथिल आरोपी निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने दोन पथके नवी मुंबई येथे पाठवण्यात आली व तेथुन आरोपी ताब्यात घेतले आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपींनी रिट्स गाडीमधुन बार्शी शहरात येवुन घरफोडया केल्या आहेत.त्यांनी त्याच दिवशी व आदल्या दिवशी बारामती, कुडुवाडी, टेंभुर्णी या भागात चो-या केलेल्या आहेत. त्यांनी सदर गुन्हयामध्ये वापरलेली रिट्स चारचाकी मारूती वाहन ताब्यात घेतले आहे. आरोपी हे नवीमुंबई, ठाणे येथिल रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील आरोपी महेंद्र उर्फे मोटया अविनाश पाटील हा तुर्भे पोलीस ठाणेस तडीपार झालेला होता.सध्या तो वाशी पोलीस ठाणेस हवा आहे.

वरील आरोपीतीवर नवी मुंबई, ठाणे,रायगड या जिल्हयातील रेकॉर्डवरील आरोपी आहेत. आरोपी मारूती चंद्रशेखर दासर यांचे वर २ गुन्हे, महेंद्र उर्फ मोटया अविनाश पाटील याचे वर ३६ गुन्हे,अभिजीत गौतम कांबळे याचे वर १२ गुन्हे, अजय अर्जुन कानगुलकर याचे वर ०१ असे विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली, स्थानीक गुन्हे शाखेचे पो नी सर्जेराव पाटील, बार्शी शहर चे पो.नी रामदास शेळके, सपोनी ज्ञानेश्वर उदार,पो.उ.नि.शामराव गव्हाणे,स.पो.फौ. अजित वरपे,अरूण माळी,लक्ष्मण भांगे,रवि लगदिवे,ज्ञानेश्वर घोंगडे,फिरोज बारगीर,अर्जुन गोसावी, वैभव ठेंगल,मनिष पवार व सायबर शाखेचे पो.कॉ. रतन जाधव यांनी यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here