माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण….!

0
463

माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण….!

खासदार नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व सामान्य व्यक्तींबरोबर राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा कोरोनाने आपल्या विळख्यात ओढले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे कोविड-१९ ची चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्याला सुद्धा त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेऊन स्वतःची आणि परिवाराची कायजी घेण्याचे आवाहन राणेंनी केले आहे.

“कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी कराव” असे ट्विट त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here