बार्शीत आज माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सुरू होणार 1 हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर

0
161

बार्शीत आज माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सुरू होणार 1 हजार बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर

सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार ; मंत्री एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर राहणार उपस्थित

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.रुग्णांची ही गरज ओळखून राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते आ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने बार्शीतील लातूर बायपास रोडवर असलेल्या त्यांच्या जेएसपीएम संस्थेच्या भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये 1000 खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.

शुक्रवार दिनांक सात मे रोजी दुपारी साडेबारा वाजता राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शुभहस्ते या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन होणार आहे.यावेळी प्रा. तानाजीराव सावंत, यांच्यासह बार्शी तालुका व उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बार्शी हे वैद्यकीय उपचारासाठी सोयीचे असून उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांना देखील उपचारासाठी बार्शीत यावे लागते.

त्यासाठी मध्यवर्ती आणि सर्वांच्या सोयीचे असे ठिकाण या सेंटर साठी निवडले आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये संपूर्ण आरोग्य सेवा पूर्णपणे मोफत दिल्या जाणार आहेत. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णसेवेसाठी असणार आहे.शिवाय मोफत एक्स-रे ,कोविडच्या वेगवेगळ्या आठ रक्त तपासण्या, दोन वेळचे जेवण, चहा, नाश्ता, प्रशिक्षित योगा योगा टीचर, प्रत्येक तीन रुग्णास शक्य असेपर्यंत स्पेशल रूम आदी सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे प्रा. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.रामचंद्र घोगरे यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here