गाडेगाव सोसायटीवर माजी मंत्री दिलीप सोपल गटाचे निर्विवाद वर्चस्व
बार्शी : अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या ठरलेल्या गाडेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाने मतदान प्रक्रियेतून 10 पैकी 8 जागेवर भरघोस मताने विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व स्थापन केले.
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली व गाडेगावचे स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भालके, नागनाथ पाटील, उपसरपंच धोंडीराम नागणे, गजानन बोराडे, विष्णू पाटील, शाम भालके, गणेश नागणे, शिवसेना शाखाप्रमुख मिठू बोराडे, संतोष भालके, प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली.


या निवडणुकीत चंद्रकांत जगताप, यशवंत भालके, भरत जाधव, अरुण बोराडे, बबन भालके, गंगाधर नरके, सौ. उमा जाधव, सौ. सुवर्णा नरके हे उमेदवार विजयी झाले.
यावेळी विजयी उमेदवारांचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी अभिनंदन करुन सत्कार केला.