कव्हे येथे परस्परविरोधी जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
80

कव्हे येथे परस्परविरोधी जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल

बार्शी प्रतिनिधी :

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तुम्ही कांदयातुन बैलगाडी का आणली असे जाब विचारण्यास गेलेल्या फिर्यादीस मारहाण व त्याचे वडीलास लाकडी रूमण्याने डोक्यात मारून हातावर इळ्याने मारून जखमी केल्याप्रकरणी अमोल शहाजी जाधव (रा.कव्हे ता.बार्शी ) याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.


यात बिभीषण चव्हाण , अजित चव्हाण दोघे रा. कव्हे ता. बार्शी असे आरोपीचे नाव आहे .

अधिक माहीती की दि .१७ डिसेंबर रोजी सायं ६ वा कव्हे येथे दत्तात्रय जाधव यांचे शेतात फिर्यादी अमोल चे वडील शहाजी जाधव हे बिभीषण चव्हाण व अजित चव्हाण यांना तुम्ही माझ्या कांदयाच्या शेतातुन बैलगाडी का आणली हे विचारण्यास गेले असता त्या दोघांनी शिवीगाळ करून बिभिषण याने लाकडी रूमन्याने डोक्यात तर अजित याने लोखंडी विळ्याने हातावर मारुन जखमी केले तसेच फिर्यादी अमोल यास बिभीषणने लाकडी रुमण्याने मारहाण केली .

तसेच माझा मुलगा पोलिस आहे माझ तुम्ही काय करु शकत नाही . मीच तुमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला जाऊन अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करतो व जेलमधे बसवतो अशी धमकी देऊन फिर्यादी अमोलच्या खिशातील डायरीव रोख तीन हजार रूपये हिसका मारून आरोपी अजित याने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीविरूध्द भादवि ३२७, ३२४, ५०४,५०६प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे .अधिक तपास पोहे कॉ शेख करित आहेत .

तर कव्हे ता. बार्शी येथे  मी चांभार समाजाचा आहे हे माहीत असुनही ये जातीवाचक शिवीगाळ करून तुला लय माज आला काय आमच्या शेतातुन बैलगाडी का आणली असे म्हणून शिवीगाळ करून काठीने दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बिभीषण बळीराम चव्हाण (वय ६० रा.कव्हे, ता.बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहाजी जाधव व अमोल शहाजी जाधव रा.कव्हे ता. बार्शी या दोघां आरोपीविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर करीत आहे.

……………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here