बार्शीत कोरोना वाढीला कारणीभूत ठरलेल्या बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

0
553

बार्शीत धक्कादायक प्रकार समोर

बोगस डॉक्टरकडुन बार्शीसह परिसरात कोरोनाचा उद्रेक

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अनेक व्यक्ती कोरोनाबाधित, गुन्हा दाखल

बार्शी:कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना गावो-गावी फिरून घरोघरी जाऊन इंजेक्शन, सलाईन, ऍलोपॅथिक औषधे वापरून बार्शीतील एका कोरोना बाधित बोगस डॉक्टरने स्वतः रुग्णांवर उपचार करीत असल्याने बार्शी शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे .

यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी पोलिसात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .श्रीमंत हरिश्‍चंद्र खंडागळे (वय ५१ रा .राऊत चाळ,बार्शी) असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्यास आता क्वारंटाईन करण्यात आले आहे .

अधिक माहीती की श्रीमंत खंडागळे यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शिक्षणाची पात्रता नाही तसेच वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवानाही नाही . असे असताना स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही तो राजरोसपणे घरोघरी जाऊन कोरेानासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ऍलोपॅथीची औषधे, इंजेक्शन, सलाईन दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक संशयित रुग्ण त्याच्या संपर्कात आले व अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . यामुळे या कोरोनाचे उद्रेक वाढविण्यास कारणीभुत ठरल्याने अधिक विषाणूचा धोका आणखी वाढला आहे .

.या भोंदू डॉक्टरवर यापुर्वीच कारवाई झाली असती तर काही गावांमध्ये आता अचानक जी रुग्णवाढ झाली आहे, ती झाली नसती. या भोंदू डॉक्टरने उपचारात वेळ घालविल्यामुळे दोन महिन्यांपुर्वी तालुक्यात पहिला कोरोनाबळी गेला होता. त्याचवेळी याचे कारनामे उघड झाले होते. कसल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण झालेले नसतानाही तो कोणाच्या तरी वरदहस्तामुळे हा भोंदू परिसरातील अनेक गावांमध्ये फिरून घरोघरी जाऊन कोरोनाची लक्षणे असलेल्यांवर उपचार करत होता.

त्या रुग्णांचा त्रास खूप वाढल्यांनतर आपले हात झटकून त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवित होता, मात्र रुग्ण सिरीयस झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे डॉक्टरांच्या उपचारालाही मर्यादा येत होत्या. त्यातच पहिला कोरोना रुग्ण जामगाव येथे दगावला होता. यावेळी या भोंदू डॉक्टरचा कारनामा उघड झाला होता.

आरोग्य प्रशासनाला त्याने औषधोपचार केलेल्या रुग्णांची माहिती त्याचवेळी मिळाली होती. तरीदेखील त्याच्यावर त्यावेळी कोणतीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे चटावलेला हा डॉक्टर आपला नियमबाह्य बेजबाबदारपणे गोरखधंदा तसाच पुढे चालू ठेवून तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्यास कारणीभूत झाला आहे. त्याच्याविरोधात आता महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम व भारतीय साथरोग नियंत्रण कायद्यानुसार बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here