बार्शी : बार्शी तालुक्यातील सुमंत कुलभुषण नरखडे (वय ४३), रा. गुळपोळी यांच्या शेतामध्ये दोन दिवसांपासून जेसीबीच्या सहाय्याने लेव्हल करण्याचे काम सुरु होते.
सुमंत नरखडे व त्यांचे भाऊ अनंत कुलभुषण नरखडे या दोन भावांच्या उपस्थितीत दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सदर काम सुरु असताना, सायंकाळी सातचे सुमारास गावातील गौतम बलभिम चिकणे, नामदेव गौतम चिकणे, अक्षय चंद्रकांत सांवत, व नागेश मधुकर शिंदे (सर्व रा. गुळपोळी) हे तेथे आले व तुम्ही जेसीबी चालवू नका, तुमच्या शेतातून सार्वजनिक रस्ता आहे असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, डाव्या बाजूस कपाळावर दगडाने मारुन जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेला भाऊ अनंत नरखडे यालाही मारहाण केली.

अशी तक्रार सुमंत कुलभुषण नरखडे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दिल्यावरुन चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आहे.