थकवा जाणवतो आहे ; तो घालवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय

0
4842

धावपळीच्या जीवनपद्धतीमुळे ताण-तणाव, पुरेशी झोप न घेणे, अवेळी जेवणं अश्या गोष्टी आपण सगळेच करत असतो पण या गोष्टींचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. यामुळे आपल्याला छोटे मोठे आजार व्हायला लागतात. आज आपण जाणुन घेणार आहोत रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

आपल्या शरीरातील पांढर्‍या रक्त पेशी आपल्याला आजारांपासुन वाचविण्याचे कार्य करत असतात, जेव्हा रक्तामध्ये पांढर्‍या रक्त पेशींची कमतरता येते तेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबू वर्गीय म्हणजेच संत्री, मोसंबी फळ खा. लिंबू वर्गीय फळामध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी टॉमेटो खा. टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमितपने आवळ्याचा आपल्या आहारात समावेश करा यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते.

आपले शरीर झोपेमध्ये शरिराला पुरक अशा काही हार्मोन्सची निर्मिती करत असते. झोपेच्या चक्रात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम आपोआपच शरिराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. सात तासांपेक्षा कमीवेळ झोप घेतल्यास शरीर त्याला सक्षमपणे प्रतिकार करू शकत नसते. निरोगी आरोग्यासाठी किमान ७-९ तास झोप आवश्यक असते.

नियमित व्यायाम केल्याने शरिरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो, आणि रोगप्रतिकारक पेशीचा संचार वाढतो. तसेच व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते व चांगली झोप मिळते.

आपल्याला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here