वगळलेल्या 4 मंडळातील शेतकऱ्यांचा 39 कोटी 50 लाखाचा अतिवृष्टीचा निधी मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
बार्शी – तालुक्यातील 4 मंडळे त्यामध्ये नारी, सुर्डी,खांडवी,वैराग मंडळ वगळण्यात आले होते व या मंडळातील हजारो शेतकरी मदती पासून वंचित राहणार होते सतत पाऊसाने शेती पिकाचे नुकसान होऊन देखील यांना अतिवृष्टी ची मदत मिळाली नव्हती .


या मंडळातील वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही प्रामाणिक भूमिका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर याची राहिली आहे त्या अनुषंगाने 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन च्या बैठकीत त्यानी हा विषय घेतला. 1 नोव्हेंबर 2021 रोजी तहसील कार्यालयात आमदार राजेंद्र राऊत, माजी मंञी दिलीप सोपल व तहसीलदार व तालुका स्तरावरील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात देखिल अशीच परिस्थिती असताना त्यांना मदत मिळाली मग या 4 विभागातील शेतकरी वंचित ठेवता येणार नाहीत.
सततचा पाऊस व 33 टक्के पेक्षा जास्त शेतीपिकाचे नुकसान झाले आहे अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांना 4 नोव्हेंबर 2021 रोजी पत्र दिले व 15 मे 2015 च्या शासन निर्णया प्रमाणे उस्मानाबाद जिल्हयात मदत मिळाली त्याप्रमाणे आपण प्रस्ताव पाठवा मदतीचे शासन दरबारी आम्ही प्रयन्त करू असे आदेश दिल्यानंतर आज तहसीलदार यांनी या चार मंडळातील 33133 शेतकरी व 39 कोटी 50 लक्ष मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाला आहे.