पाटलांच्या टीकेला शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे जोरदार प्रतिउत्तर
ग्लोबल न्यूज : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार झालेल्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जोरदार टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचे संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचे दिसतं असा टोला पाटील यांनी शेट्टींना लगावला होता.


आता पाटलांच्या या टीकेला शेट्टी यांनी ट्विटरवरून प्रतिउत्तर दिले आहे. “चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यामध्ये नेहमी राजकारण असतं. राजकीय हेतूनेच कधी काळी तुम्ही मला विष्णूचा अवतार म्हटलं होतं. माझ्या डोक्यात मात्र फक्त शेतकरी आणि शेतकरीच असतो.
म्हणूनच केंद्र सरकारने दहा हजार टन आयातीचा निर्णय घेता क्षणी, मी १० जुलै रोजीच ट्वीट करून पंतप्रधानाच्या लक्षात आणून दिल होत. २१ जुलैला मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय तुम्हाला खरोखर शेतकर्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हा’,” असे आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.