हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा प्रदाफाश ; ४ महिलांची सुटका, चौघांना अटक
पुणे – येथील पाषाण परिसरात सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलीसांनी चार तरुणींची सुटका केली असून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली असून एक महिला फरार आहे.

सुरेश प्रल्हाद रणवीर (वय ३५), नाकसेन रामदास गजघाटे (वय ५२), रविकांत बालेश्वर पासवान (वय ३४) आणि दीपक जयप्रकाश शर्मा (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चतुःश्रुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरातील धनकुडे वस्ती येथील एका रो-हाऊसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वेश्याव्यवसाय करताना चार महिलांना रंगेहाथ पकडले. या सर्व महिलांची सुटका करण्यात आली.
आरोपी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो दाखवून ग्राहकाला रो हाऊसमध्ये बोलावून घेत असत. यावेळी पोलिसांनी ११ मोबाईल,४ लॅपटॉप आणि वेश्याव्यवसायासाठी वापरण्यात येणारी टाटा सफारी गाडीदेखील जप्त करण्यात आली आहे.