चिंतेत वाढ:सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात ही 250 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; एकाच मृत्यू

0
68

सोलापूर -जिल्ह्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चिंतेची होत चालली आहे. रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 260 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 159 पुरुष तर 101महिलांचा समावेश आहे. रविवारी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 87 आहे. आज तब्बल 2304 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 2044 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांनी दिली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील 44 रुग्ण, यामध्ये 33 पुरुष 11 महिला,बार्शी येथील 27 पुरुष तर 25 महिला असे एकूण 52 जण,करमाळा येथील 4 पुरूष ,माढा येथील 10, यामध्ये सात पुरुष, तीन स्त्रिया,माळशिरस येथील 44 बाधित रुग्णांमध्ये 26 पुरुष 18 महिला, मंगळवेढा मधील 3 पुरुष, 2 महिला, मोहोळ तालुक्यातील 40,यामध्ये 26 पुरुष,14 महिला, उत्तर सोलापुरातील बारा, यात सहा पुरुष सहा महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पंढरपूर तालुक्यातील 30, यात 18 पुरुष 12 महिला सांगोला तालुक्यातील 2 महिला आणि दक्षिण सोलापुरातील 17 रुग्ण यात 9 पुरुष 8 महिला असे एकूण 260 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 159 पुरुष तर 101 महिलांचा समावेश होतो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1823 इतकी झाली आहे. यामध्ये 1136 पुरुष तर 687 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 44 जणांचा मृत्यू झाला आहे यात 33 पुरुष तर 11 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1178 आहे .यामध्ये 718 पुरुष 460 महिलांचा समावेश आहे. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 601 आहे यामध्ये 386 पुरुष तर 215 महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here