गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदेंचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
335

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे यांचा मृतदेह मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रेल्वे रुळावर आढळून आल्याने खळबळ उडली आहे.

भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. दरम्यान अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरुन खाली पडल्याने छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. संबंधित मृतदेह हा भगवान शिंदे यांचा असल्याची नातेवाईकांनी खात्री केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भगवान शिंदे यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे यांनी आत्महत्या केली, त्यांचा पुलावरुन पडून अपघाती मृत्यू झाला, की त्यांच्यासोबत घातपात घडला, हे अद्याप अस्पष्ट आहे. यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here