सोलापूर:उत्पादन शुल्क विभागाची सामूहिक मोहिम हातभट्ट्यांची दाणादाण,13 वारस गुन्हे दाखल-

0
130

उत्पादन शुल्क विभागाची सामूहिक मोहिम हातभट्ट्यांची दाणादाण,13 वारस गुन्हे दाखल- रु 6 लाख 69 हजाराचा मुद्देमाल जप्त

दिनांक 15/02/2022 रोजी मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क श्री कांतीलाल उमाप, मा. विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग श्री प्रसाद सुर्वे व अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,सोलापूर श्री. नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाणांवर तसेच देशी दारु विक्री ठिकाणांवर सामूहिक छापे टाकून मोहिमेत एकूण 14 गुन्हे नोंद करून रु.6 लाख 69 हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
y

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेवा तांडा, वडजी तांडा व उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून अवैध गावठी दारु तयार करणारे इसम नामे राहुल विलास चोपडे, वय- 43 वर्षे, रा-155, सळई मारुती दक्षिण कसबा, पत्रा तालीम शिव मंदिर जवळ, सोलापूर, जि.सोलापूर 2. रामु भिलु चव्हाण, वय-42 वर्षे, रा- गुळवंची तांडा, ता.उत्तर सोलापूर, जि.सोलापूर 3. राजेंद्र भिमराव राठोड, वय- 42 वर्षे, रा- गुळवंची, कारंबा, ता.उ.सोलापूर, जि.सोलापूर या आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणांवरुन अटक करण्यात आली असून त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या मोहिमेत गावठी दारु निर्मितीसाठी आवश्यक 21,250 लिटर गुळमिश्रित रसायन, 100 लिटर हातभट्टी दारु व इतर साहित्य असा एकूण रु. 4,87,100/-चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर मोहिमेत निरीक्षक ब विभाग श्री, एस.एम.मस्करे, निरीक्षक ए. आय.खतीब, दुय्यम निरीक्षक श्री. एस.ए.पाटील, श्री. एस. डी. झगडे, श्री. जी.एस.उंडे, श्री. जी. एच. हजारे, इतर अधिकारी व जवान स्टाफ यांनी सहभाग घेतला.

तसेच निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस श्री एस. एस. कदम व सहाय्यक दुय्यम निरिक्षक पवार, जवान कर्मचारी पाटील, माळी, काळे व वाहनचालक नवले यांच्या पथकाने 15 फेब्रुवारी रोजी देशी दारु वाहतूक व विक्रीवर कारवाई करुन एकूण 5 वारस गुन्हे नोंद करुन 4 आरोपींना अटक केले आहे. अटक केलेल्या आरोपी नामे मुमताज शकिळ तांबोळी, नवनाथ अशोक काळे, बाळू गोरख काळे, सातप्पा अरुण शिंदे व राजाराम रावसाहेब वलेकर यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदर कारवाईमध्ये 2 मोटारसायकल वाहनांसह 155 लिटर हातभट्टी दारु व 12.24 लिटर देशी दारु असा एकूण 1 लाख 72 हजार 510/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


तसेच मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क, पंढरपूर श्री मुळे, दुय्यम निरिक्षक श्री शेख व जवान कर्मचारी यांच्या पथकाने 15 फेब्रुवारी रोजी छापा टाकून शंकर गोविंद पवार, वय 49 वर्षे या इसमास हातभट्टी दारु विक्री करतांना अटक केली असून त्याच्या ताब्यातून 1 हजार 450 रुपये किंमतीची 25 लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे.

आवाहन

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here